वाशिम प्र; कारंजा येथील पत्रकार सुधीर देशपांडे हे आपल्या पुतण्याला सोबत घेऊन २१ एप्रिल ला शेतीच्या कामानिमित्त दुचाकीने जात असताना जुने वैमनस्यातून विनाकारण अमानुष मारहाण करणाऱ्या त्या उपनिरीक्षकासह त्यांचे साथीदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्ह्यातील पत्रकार एकवटले असून मानोरा तालुक्यातून तालुका पत्रकार संघ ,प्रेस क्लब,मंगरुळपिर व रिसोड येथील पत्रकारांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन पत्रकार हल्ला विरोधी कायदा अंतर्गत कारवाईची मागणी निवेदनातून केली आहे. कारंजा येथील पत्रकार तथा शेतकरी सुधीर देशपांडे हे आपल्या पुतण्याला घेऊन आपल्या दुचाकीने ता २१ एप्रिल ला शेतात जात असताना ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक व त्यांचे दोन सहकारी यांनी जुन्या वैमनस्यातून सुधीर देशपांडे यांना अमानुषपणे मारहाण केली वास्तविक लाकडाऊन काळात शासनाने शेतीकामाला शिथिलता दिली आहे देशपांडे हे आपल्या शेतात सकाळी ११ वाजता खताचे पोते नेत असताना त्याच्या सोबत नाहक वाद निर्माण करून देशपांडे यांना मारहाण करणाऱ्या त्या पोलीस उपनिरीक्षक व त्यांचे दोन साथीदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे निवेदन मानोरा येथील तहसीलदार यांना मानोरा पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण ठाकरे ,जगदीश राठोड,वसंत राठोड,संतोष कांबळे, गावंडे प्रेस क्लबचे माणिक डेरे,अस्लम पोपटे, संजय अलदर,बबन देशमुख,मंगरुळपिर प्रा नंदलाल पवार,रिसोड येथील पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी निवेदन दिले असून निवेदनाच्या प्रति गृहमंत्री ना अनिल देशमुख, पालकमंत्री शंभूराज देसाई,जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, पत्रकार हल्ला कृती समिती आदींना पाठविले आहे.
पत्रकार देशपांडे यांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा ! जिल्ह्यातील पत्रकार एकवटले