राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे राज्यातील भटक्या विमुक्त जमातीतील लोककलावंतांच्या बॅंक खात्यात जमा होणार प्रत्येकी ३ हजार रुपये
--- ,राष्ट्रवादी काँग्रेस व वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष शरद पवारसाहेबांनी दुर्लक्षित लोककलावंतांसाठी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमांतून मदतीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे असे सांगितले.*

*राज्यातील भटक्या विमुक्त जमातीतील लोककलावंतांच्या मदतीला राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट धावून आली असून प्रत्येक लोककलावंतांच्या खात्यात प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात येणार असुन आत्तापर्यंत राज्यातील जवळपास ५ हजार भटक्या विमुक्त जमातीतील लोककलावंतांची नोंद झाली असून त्यांच्या बॅंक खात्यात टप्याटप्याने प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे खजिनदार आमदार हेमंत टकले यांनी दिली आहे.*

*..आता राज्यातील वेगवेगळ्या भागांत फडामध्ये व अन्य ठिकाणी राहणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीतील लोककलावंतांची यादी, गांव आणि बॅंक खाते यांची नोंद  घेण्याचे कामं सुरू आहे. ही मागणी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विमुक्त जाती भटक्या जमाती सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिरालाल राठोड यांच्या विनंतीवरून गोरगरिबांना अडचणीत दिलासा देणारी ही योजना पदरी पडली पाहिजे    तरी राज्यातील नाथपंथी भराडी गोंधळी तमाशा वाले नाटककार बहुरूपी वादक शाहीर अशा भजन तबला वादक कार यांना मदत होणार आहे तरी कृपा करून लवकरात लवकर आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता मोबाईल नंबर कुठले कलाकार आहात याचे वर्णन बँक खाते व आयएफसी कोड नंबर असे तुरंत नाव व यादी माझ्याकडे पाठवावे ही आग्रहाची विनंती आपला हिरालाल राठोड अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी विमुक्त जाती भटक्या जमाती सेल महाराष्ट्र प्रदेश.

Popular posts
स्वस्त धान्य दुकानांविषयी तक्रारींचा निपटारा करण्यासाठी भरारी पथक स्थापन
पत्रकार देशपांडे यांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा ! जिल्ह्यातील पत्रकार एकवटले
Image
चुकीची हद्द दाखवून ग्रामीण पोलिसांनी केले शेतकऱ्यावर गुन्हे दाखल ठाणेदार इंगळे व पोेलीस उपिनिरीक्षक वाघमोडे यांची मनमानी, पंचनाम्या दरम्यान घटनास्थळही बदलले
भूमिपुत्र आले गावकऱ्यांच्या मदतीला धावून! एक शे दहा किटचे वाटप
Image