मानोरा प्र. कोरोना सारख्या महामारीमुळे शासनाने लाकडाऊन घोषित करून आपल्या परीने नागरिकांना मदतीचा हात पुढे केला आहे. फुलउमरी व सोमेश्वरनगर येथील भूमिपुत्र सुद्धा गावकऱ्यांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांच्या मदतीमुळे गावातील एकशे दहा गरजू नागरिकांना पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाईक व सेन्ट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक मिलिंद ठोंबरे यांचे हस्ते किटचे वाटप करण्यात आले.
फुलउमरी व सोमेश्वरनगर येथील भूमिपुत्र नौकरी,व्यवसाय,उद्योग व कंपनीत कामानिमित्त बाहेर गावी राहतात. गावातील नागरिकांना मदत करता यावी म्हणून *गराशा बहुउद्देशीय फाऊंडेशन* संस्था रजिस्ट्रेशन केली , या संस्थेकडून गावातील नागरिकांना कोरोना सारख्या महामारीत हाताला काम नसल्यामुळे फुलउमरी व सोमेश्वरनगर येथील गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे - गोडतेल एक किलो, तूरडाळ एक किलो, चटणी, मसाला, हळद, मीठ, साखर, आंघोळीची साबण,कपडे धुण्यासाठी साबण , खोबरेल तेल आदींचे किट ता. २१ एप्रिल२०२० ला सोमेश्वरनगर येथे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाईक व सेन्ट्रल बँकेचे व्यवस्थापक मिलिंद ठोंबरे यांचे हस्ते वाटप करण्यात आले. फाऊंडेशनच्या या उपक्रमाची राजेंद्र नाईक व मिलिंद ठोंबरे यांनी मुक्तकंठाने प्रसंशा केली व *इतरही भूमिपूत्रांनी या कठीण घडीला ग
रजूंच्या सहकार्यासाठी समोर येऊन जन्म गावाचे पांग फेडण्याचे आवाहनही केले*. यावेळी जमादार जगन्नाथ घाटे,बन्सी चव्हाण, शेख सर, डॉ धनंजय राठोड, इंजि संतोष पवार मुबई , प्रा.इंजि शैलेश उत्तमराव चव्हाण, पत्रकार अनिल राठोड, संतोष मदनजी जाधव, गोकुळ चव्हाण, ग्रा. पं. सदस्य अशोक राठोड, निलेश राठोड, सोहण राठोड, कबिरदास जाधव, सतीश कडेल, आदींची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हमसब फुलउमरी वाले ग्रुप सदस्यांनी सहकार्य केले.