मानोरा प्र ;कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनस्तरावरून विविध उपाययोजना आखत आहे गावात काही दिवस अवैध गावठी दारू सह देशी विदेशी दारू विक्री थांबविण्यात यावी यासाठी फुलउमरी येथील सरपंच नंदाताई शेलकर ,पोलीस पाटील संजना वसंत राठोड व उपसरपंच श्रावण कांबळे यांनी काही काळ अवैध गावठी दारू देशी विदेशी दारूची विक्री करू नये अशी नोटीस दारू विक्रीकरणार्यांना दिली मात्र समजपत्र देऊन दारू विक्रीत घट येण्या ऐवजी नवीन गावठी दारू पडणाऱ्याची संख्या वाढत अडल्याने ग्राम पंचायत पोलीस पाटील व उपसरपंच यांनी वाशिम जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी व दारू बंदी विभागाचे जिल्हा पोलिस अधीक्षक कानडे यांना निवेदन देऊन दारू बंदी करिता गावकऱ्यांना सहकार्य न करणाऱ्या अवैध दारू विक्री करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे लाकडाऊन मध्ये मुबल दारू मिळत असल्यामुळे गावात दररोज भांडण.
च्या संख्येत वाढ होत आहे. काही युवक आपले अँड्रॉइड मोबाईल गहाण ठेवून दारू पित आहे तर काही इसम मोलमजुरीचे पैसे दारूत उडवीत असल्यामुळे लाकडाऊनच्या काळात कुटूंबानी जगावे तरी कसे असे एका युवकांच्या आईने दारू बंदी करा असी आर्थहाक दिली आहे.दारू विक्रीतुन दारू गाळप करणारे मालामाल होत असून दहा रुपये ग्लासची दारू पंचवीस रुपये ग्लास तर देशीचा नवद मिलीचा पोवा अंशी रुपयाला विकला जात असल्यामुळे दारू गाळप बंद होण्या ऐवजी दारू गाळप करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे दारू गाळप करणारे ग्राम पंचायत व पोलीस पाटील यांचे समज पत्राला केराची टोपली दाखविल्याने आता दारू बंदी साठी गावातील युवकांच्या सहकार्याने दारू बंदी विभाग व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने दारू विक्री करणार्यांवर रीतसर कारवाही करण्याचा मनोदय ग्राम पंचायत व पोलीस पाटील यांनी बोलून दाखविला असल्याने दारू बंदी होणार काय या कडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कोरोना ही महामारी रोखण्यासाठी जागतिक स्तरावरुन प्रयत्न होत असून गावातील नागरिकांना कोरोना आजाराचा संसर्ग फैलाव होऊ नये म्हणून गावातील दारू गाळप करणारे नागरिकांनी काही दिवस लाकडाऊन काळात दारू विक्री थांबविण्यात यावी या करिता सरपंच पोलीस पाटील यांचे स्वाक्षरीचे संजपत्र दिले दारू विक्री थांबेल असी अपेक्षा होती मात्र गावातील काही नवीन नागरिक दारू गाळप करून दारू खुलेआम विक्री करीत आहे त्यामुळे आता दारू बंदी विभाग व पोलीस विभागाची मदत घेउ . श्रावण कांबळे उपसरपंच ग्रा प फुलउमरी.