सोमेश्वरनगर चेकपोस्ट ला जिल्हापोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांची भेट

मानोरा प्र ; वाशिम जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सोमेश्वरनगर येथील चेकपोस्ट ला भेट देऊन पोलीस कर्मचारी यांचे सोबत संवाद साधला व काही मार्गदर्शक सूचनाचे काटेकोर पालन करण्यात यावे या बाबत सूचना देण्यात आले. देशात व राज्यात  कोविड १९ विषाणूजन्य आजाराने थैमान घातले असताना वाशिम जिल्ह्यात  कोरोनाचा एकमेव रुग्ण आढळला त्यावर वाढ झाली नसल्यामुळे महानगर व विदेशातून गावात नागरिक येऊ नये म्हणून मानोरा तालुक्यात यवतमाळ जिल्हा सीमा सील करून तालुक्यात आठ ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आले आहे ता १७ एप्रिल ला सायंकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सोमेश्वरनगर येथील चेकपोस्ट ला भेट देऊन कर्मचारी यांचे सोबत संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिक   परवानगी शिवाय आपल्या हद्दीत प्रवेश करीत असल्यास आपल्या वरिष्ठ अधिकारी यांचे सोबत संपर्क करून माहिती द्यावी असे परदेशी यावेळी म्हणाले महानगरातून गावात येणाऱ्या नागरिकांचे विलगिकरण करण्याबाबत व अशा नागरिकांचे आरोग्य तपासणी करूनच चौदा दिवस अशा नागरिकांना विलगिकरण करून त्यावर गावातील समितीने विशेष लक्ष द्यावे असे ते म्हणाले.यावेळी ठाणेदार शिशिर मानकर ,जगन्नाथ घाटे,बन्सी चव्हाण,तलाठी घोत्रे, रामाघरे आदी हजर होते.