मानोरा प्र; जगभरात कोरोना संसर्ग आजारामुळे नागरिकाच्या हाताला काम नाही या महामारी आजारातून नागरिकांचे बचाव करण्यासाठी शासनाने लाकडाऊन घोषित केल्यामुळे दोन वेळचे जेवण काही कुटूंबाना मिळणे कठीण होऊन बसले त्यात शासन त्याचे परीने नागरिकांना रास्तभाव दुकानातून धान्य पुरवठा करीत आहे आपल्या गावचे भूमिपुत्र आपल्या गावातील नागरिकांना काही तरी मदत करण्याचा उद्देशाने गराशा फाऊंडेशन फुलउमरी ने गावातील गरजू नागरिकांना जीवनाशयक साहित्याची पन्नास कुटूंबाना किट वाटप करून एक आदर्श जनते समोर ठेवले ते इतरांनी सुद्धा असा हात भार लावण्याचे काम हाती घेण्यात यावे असे भावोदगार तहसीलदार डॉ सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले . फुलउमरी येथे ता १९ एप्रिल ला नंदिकेश्वर महाराज मंदिर सभागृहात गराशा फाऊंडेशन तर्फे गावातील गरजू नागरिकांना जीवनावशक कितचे वाटप यातसाखर,चहापत्ती,गोडतेल,मीठ,तिखट,हळद, मसाला,तूरडाळ आदी साहित्याची पन्नास किट गरजू गरीब नागरिकांना वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी ठाणेदार शिशिर मानकर,पो हे का सुभाष महाजन,डॉ धनंजय राठोड,रमेश महाराज,प्रा खुशाल राठोड,पोलीस पाटील सौ संजनाताई वसंत राठोड,उपसरपंच श्रावण कांबळे,प्रा इंजि. शैलेश उत्तमराव चव्हाण,संतोष पवार ,पत्रकार अनिल राठोड,वसंत राठोड,निलेश राठोड,सोहण राठोड,कबिरदास जाधव,सतीश कडेल आदी उपस्थित होते पुढे बोलतांना चव्हाण म्हणाले की फाऊंडेशनने शोशल डिस्टनचे पालन करून आपल्या गावातील नागरिकांसाठी गावातील भूमिपुत्रांना जे कार्य हाती घेतले ते कार्य कौतुकास पात्र आहे आज गावातील नागरिक या महामारी सारख्या आजाराने आपले घर सोडून बाहेर जाऊ शकत नाही त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांचे समोर दोन वेळचे जेवणाचे वांदे झाले असताना या कार्यात सहकार्य करून आपला वाटा उचलण्याचे कार्य इतरा समोर आदर्श ठेवले आहे.यावेळी ठाणेदार मानकर यांनी सुद्धा फाऊंडेशनच्या कार्याला शुभेच्छा देऊन सामान्य जनतेच्या हिताचे असे कार्य आपले हातून होवो असे म्हणत गौरविण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील हम सब फुलउमरी व्हॉट्सअप ग्रुप मधील सदस्यांनी परिश्रम घेतले. गावातील पन्नास कुटूंबातील दोनशेच्यावर नागरिकांना याचा लाभ देण्यात आला.
गराशा फाउंडेशन प्रमाणे इतरानी कार्य करावे --- डॉ सुनील चव्हाण
• ANIL RATHOD