शहिदांना ११० कोटीची देणगी देणार दिव्यांग वैज्ञानिक

मुंबई = पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी ४५ वर्षीय हमीद ए. मुर्तझा यांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीला ११० कोटी रुपयांची देणगी द्यायची इच्छा आहे. त्यांनी तसा प्रस्ताव दिला आहे. हमीद मुर्तझा सध्या मुंबईत राहत असून ते मूळचे राजस्थान कोटाचे रहिवासी आहेत. हमीद यांनी पंतप्रधान कार्यालयाला ई-मेल पाठवून पंतप्रधान मोदींना भेटण्याची वेळ मागितली आहे. हमीद यांनी कोटामधल्या कॉलेजमधून कॉर्मसमध्ये पदवी घेतली. ते जन्मापासून दिव्यांग आहेत. सध्या मुंबईत ते वैज्ञानिक म्हणून काम करतात. राष्ट्रीय मदत निधीचे उपसचिव अग्नि कुमार दास यांनी हमीद मुर्तझा यांना त्यांची माहिती पाठवायला सांगितली आहे. आपल्या मातृभूमीसाठी जीवन देणार्यांना मदत आणि सहाय्य करण्याची इच्छा प्रत्येक नागरीकाच्या रक्तात असली पाहिजे असे हमीद म्हणाले. आपल्या वैज्ञानिक शोधांना सरकारकडून वेळीच मान्यता मिळाली असती पुलवामासारख्या दुर्दैवी घटना रोखता आल्या असत्या असे त्यांनी सांगितले.